चाेरट्याने शेतीपयाेगी साहित्य पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:15+5:302021-07-11T04:08:15+5:30
केळवद : चाेरट्याने शेतकऱ्याच्या शेतातून २३ हजार १०० रुपये किमतीचे विविध शेतीपयाेगी साहित्य चाेरून नेले. ही घटना केळवद (ता. ...

चाेरट्याने शेतीपयाेगी साहित्य पळविले
केळवद : चाेरट्याने शेतकऱ्याच्या शेतातून २३ हजार १०० रुपये किमतीचे विविध शेतीपयाेगी साहित्य चाेरून नेले. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (भदी) शिवारात नुकतीच घडली.
डाॅ. अनुप जयस्वाल यांची पिपळा (भदी) शिवारात शेती असून, मधुकर विठाेबा पन्नाते, रा. सटवामात मंदिर, सावनेर हे त्या शेतीची वहिवाट करतात. त्या शेतातील घरात काही शेतीपयाेगी साहित्य ठेवले हाेते. शेतात कुणीही नसताना चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने घरातील सात हजार रुपयांची पाण्याची माेटर, सहा हजार रुपयांच्या जुन्या माेटारी, सात हजार रुपयांचे दाेन फवारणी पंप, दाेन हजार रुपयांचे वायर, ४०० रुपयांचे पाईप व ७०० रुपयांचे इतर साहित्य असे एकूण २३ हजार १०० रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच मधुकर पन्नाते यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रामराव पवार करीत आहेत.