बुटीबोरी-तुळजापूर हायवे होणार फोर लेन

By Admin | Updated: September 4, 2016 02:44 IST2016-09-04T02:44:20+5:302016-09-04T02:44:20+5:30

नागपूर (बुटीबोरी) ते तुळजापूर हा दहा तासांचा असलेला प्रवास आता फक्त सहा तासात पूर्ण करता येणार आहे.

Four lanes will be to Butibori-Tuljapur highway | बुटीबोरी-तुळजापूर हायवे होणार फोर लेन

बुटीबोरी-तुळजापूर हायवे होणार फोर लेन

वसीम कुरैशी  नागपूर
नागपूर (बुटीबोरी) ते तुळजापूर हा दहा तासांचा असलेला प्रवास आता फक्त सहा तासात पूर्ण करता येणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) द्वारे हा काँक्रिटचा फोर लेन (चार पदरी) मार्ग तयार करण्यात येत आहे. आठ हजार कोटी रुपये खर्चून तीन वर्षात हा मार्ग तयार केला जाणार आहे.
एनएचएआय मुख्यालयाकडून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. डीपीआरही तयार आहे. आता लवकरच कंत्राटही निघणार आहे. सुमारे ५०० किमी लांब या मार्गावर बुटीबोरी, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर व तुळजापूर हे शहर आहेत. दोन वर्षांआधी हा मार्ग राज्यमार्गात समाविष्ट होता. यानंतर या मार्गाला राष्ट्रीय राज्यमार्गात सहभागी करून घेण्यात आले. या महामार्गाचा सध्याचा क्रमांक एन. एच. ३६१ आहे. एनएचआयमध्ये समाविष्ट असतानाही हा मार्ग राज्याच्या अंतर्गत सीमेतच मर्यादित आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग बनविताना वळणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मार्गावर किमान ८० किमी प्रतितास वेगाची परवानगी असेल. परिणामी प्रवास लवकर पूर्ण होईल. सध्या हा मार्ग काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी एकेरीच आहे. शिवाय या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. डांबर रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते जास्त मजबूत व टिकाऊ असतात. म्हणूनच हा रस्ता सिमेंटचा बनविण्यात येत आहे.

या मार्गासाठी आवश्यक भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. डीपीआर तयार आहे. याच आर्थिक वर्षात कंत्राट दिले जाईल. तीन वर्षांच्या आत हा मार्ग तयार झालेला असेल.
एम. चंद्रशेखर, क्षेत्रीय अधिकारी,
एनएचएआय (नागपूर)

Web Title: Four lanes will be to Butibori-Tuljapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.