शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

दीक्षाभूमी परिसरात चार फूड झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:26 IST

दीक्षाभूमी येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी संपूर्ण भारतातून येणाºया लाखो बौद्ध अनुयायांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा,.....

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व्यवस्थेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमी येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी संपूर्ण भारतातून येणाºया लाखो बौद्ध अनुयायांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, तसेच संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा होईल. या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच दीक्षाभूमी परिसरातील चारही बाजूंनी विशेष फूड झोन तयार करावे, त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच अन्नाची नासाडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्न व औषध प्रशासनाने अन्नाची तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या.दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त आयोजनाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला, त्यावेळी अधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, माजी मंत्री नितीन राऊत, स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, प्रवीणसिंह परदेशी, स्मार्तना पाटील, महानगरपालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे आदी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी येथे दिनांक २८ ते ३१ सप्टेंबरपर्यंत महानगर पालिकेने अस्थायी शौचालय, स्नानगृह, पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरते नळ, चौवीस तास स्वच्छता, संपूर्ण परिसरात विजेची व्यवस्था, अंबाझरी घाट येथे लाईफगार्ड नियुक्त करावे, तसेच येथे पुरेशी विद्युत व्यवस्था करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध विभागांकडे जबाबदाºया सोपविल्या असून त्यानुसार विभाग प्रमुखांनी दिलेली कामे तात्काळ पूर्ण करावी, संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध सोईसुविधांबाबत यावेळी माहिती दिली.नियंत्रण कक्षदीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून, या नियंत्रण कक्षात सर्व विभागाचे अधिकारी यांची नियुक्त करण्यात येत आहे. या नियंत्रण कक्षात नियुक्त केलेल्या अधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक व नावे कळवावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. पावसाचा व्यत्यय आल्यास अनुयायांसाठी सभोवतालच्या शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्यवस्था करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.२२० नळ, १० टँकरमहानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी २२० अस्थायी नळ, १० टँकर, तात्पुरते शौचालय तसेच मोबाईल शौचालय, स्नानगृह, २३५ फ्लड लाईट तसेच तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी सांगितले.दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस ३५० बसफेºयादीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेससाठी ३५० बस फेºया करण्यात येणार आहेत. तसेच मोरभवन व इतर ठिकाणावरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या भागात बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात राहतात तेथून दीक्षाभूमीसाठी विशेष बसव्यवस्था करावी, असेही बैठकीत ठरले.माता कचेरी येथे सुसज्ज वैद्यकीय व्यवस्थादीक्षाभूमीवर येणाºया बौद्ध-आंबेडकरी अनुयायांना आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली जाते. आरोग्य विभागातर्फे यंदाही माताकचेरी येथे सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.१२०० पोलीस तैनातसुरक्षेच्या दृष्टीने दीक्षाभूमी परिसरात १२०० पोलीस तैनात राहणार असून २४ तास या संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून वाहतूक व्यवस्था, बाहेरून येणाºया बसेस व जीप थांबण्यासाठी पार्किंग झोन तयार करावे तसेच दीक्षाभूमी परिसर व दीक्षाभूमीच्या बाहेरील संपूर्ण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.