शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

काँग्रेस कार्य समितीत विदर्भातील चार चेहरे; पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:45 IST

वासनिक, पांडे, ठाकरे, ठाकूर यांचा समावेश

नागपूर : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस कार्य समितीची (सीडब्ल्यूसी) घोषणा केली असून, विदर्भातील चार नेत्यांची नावे या यादीत आहेत. यात मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे व यशोमती ठाकूर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या यादीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कॉग्रेस कार्य समितीतील सदस्यांची नावे अंतिम केली असून, सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी यादी घोषित केली. यात ३९ सदस्य, १८ स्थायी आमंत्रित सदस्य, १४ प्रभारी तर ९ विशेष आमंत्रित सदस्य आहेत. मुकुल वासनिक व अविनाश पांडे यांचे नाव काँग्रेस कार्य समितीच्या सदस्यांमध्ये आहे, तर प्रभारींमध्ये माणिकराव ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. यशोमती ठाकूर यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काँग्रेस कार्य समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्य समितीमध्ये विदर्भातील चार नेत्यांचा समावेश झाल्यामुळे विदर्भातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, विदर्भातील काही नेत्यांना यात नाव असेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचे नाव यादीत येऊ शकले नाही.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसYashomati Thakurयशोमती ठाकूरMukul Wasnikमुकूल वासनिक