चार दिवस फुल्ल डे, मग शिफ्ट ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:19+5:302021-02-15T04:08:19+5:30
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतिबाग रेल्वे कारखान्यात चार दिवसांपूर्वी येथे पूर्ण क्षमतेने संपूर्ण दिवस काम करण्याचा आदेश ...

चार दिवस फुल्ल डे, मग शिफ्ट ड्युटी
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतिबाग रेल्वे कारखान्यात चार दिवसांपूर्वी येथे पूर्ण क्षमतेने संपूर्ण दिवस काम करण्याचा आदेश काढण्यात आला. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आता या आदेशात बदल करण्यात आला असून, शनिवारपासून पुन्हा शिफ्ट ड्युटी सुरू करण्यात आली आहे.
अनलॉकनंतर मोतिबाग वर्कशॉपमध्ये मर्यादित संख्येत कर्मचारी काम करीत होते. शारीरिक अंतर राखण्यासाठी येथे शिफ्ट ड्युटी ठरविण्यात आली होती. वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. सूत्रांनुसार, येथे जवळपास ४५० कर्मचारी कार्यरत आहेत. नागपूर विभागातून नॅरोगेज रेल्वेगाड्यांचे संचालन बंद झाले आहे, तर ब्रॉडगेज रेल्वेगाड्यांच्या पूर्ण क्षमतेने देखभालीसाठी आधुनिक सुविधांसाठी कार्य पूर्ण झालेले नाही. शेडमध्ये हवे तसे काम होताना दिसत नाही. यामुळे येथे पूर्ण क्षमतेने काम होत नसल्याची स्थिती आहे. कोरोनामुळे आता फुल्ल डे ऐवजी कर्मचाऱ्यांना शिफ्ट ड्युटी करावी लागणार आहे.
...........
लवकरच होणार वृक्षारोपण
मोतिबागमध्ये कासवगतीने सुरू असलेल्या शेडच्या कामात कारखाना परिसरात सौंदर्यीकरणाची तयारी करण्यात येत आहे. सूत्रांनुसार, येथे १ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. वृक्षारोपणासाठी नियोजन करण्यात आले आहे. व्यवस्थित रूपाने करण्यात येणाऱ्या या वृक्षारोपणामुळे कारखाना परिसर आकर्षक करण्याची तयारी सुरू आहे.
.............