शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

मिहानमध्ये चार कंपन्या लवकरच बांधकाम पूर्ण करणार - एमएडीसीतर्फे नवीन रस्त्याचे बांधकाम

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 11, 2024 10:02 PM

‘गेल’चे मध्यवर्ती कार्यालय १७ एकरात बांधले जाणार

नागपूर: मिहानच्या सेक्टर २१ मध्ये दोन आयटी आणि दोन खाद्यान्न प्रक्रिया कंपन्यांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी दिली. याकरिता एमएडीसी नवीन रस्ता तयार करत आहे. याशिवाय हिंगणाला जोडण्यासाठी पतंजली बाजूकडून चौपदरी रस्ता आणि अंतर्गत रस्त्याचे कामही सुरू होणार आहे.

मिहान कॅम्पसमधील मध्यवर्ती सुविधा इमारतीतील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत पांडे यांनी मिहान विकासाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ३.५ एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात येणार आहे. मिहानमधील या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे कंपन्यांसाठी सुविधा वाढेल. मिहान-सेझमध्ये लवकरच नवीन फार्मा कंपन्या येणार आहेत. शिर्डी आणि अमरावती विमानतळाच्या विकासाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल. गडचिरोलीतील विमानतळासाठी जमिनीचा विचार सुरू आहे.

‘गेल’चे मध्यवर्ती कार्यालय १७ एकरात बांधले जाणारगॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) मिहानच्या बिगर एसईझेड क्षेत्रातील सेक्टर १२-ए मध्ये त्यांचे केंद्रीय कार्यालय स्थापन करणार आहे. गेलचे डेटा सेंटर आणि मॉनिटरिंग सेंटर राहील. सार्वजनिक क्षेत्रातील या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गेलला जमीन देण्याची आणि करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पतंजलीचा ज्यूस प्रकल्पाचे संचालन एप्रिलपासून होईल. मिहानमध्ये आतापर्यंत १ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराची आकडेवारी आणखी वाढेल.

 

 

 

टॅग्स :nagpurनागपूर