चॉक्स कॉलनीत चार कारला लावली आग
By Admin | Updated: April 20, 2016 03:08 IST2016-04-20T03:08:31+5:302016-04-20T03:08:31+5:30
इंदोरा भागातील चॉक्स कॉलनी येथे मंगळवारी सकाळी एका आॅटो डीलरच्या दुकानापुढे उभ्या असलेल्या चार कारला आग लावल्याने नुकसान झाले.

चॉक्स कॉलनीत चार कारला लावली आग
नागरिकांना धास्ती : गुन्हेगारांचा हैदोस
नागपूर : इंदोरा भागातील चॉक्स कॉलनी येथे मंगळवारी सकाळी एका आॅटो डीलरच्या दुकानापुढे उभ्या असलेल्या चार कारला आग लावल्याने नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ही आग लावली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
आॅटो डीलर अमजद खान यांच्या दुकानापुढे या चार कार ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी ९ च्या सुमारास गुरुबच्चन हा विद्यार्थी ट्युशनसाठी जात असताना त्याला पांढऱ्या रंगाची कार पेटत असल्याचे दिसून आले. त्याने आपल्या मोबाईलवरून अग्निशमन विभागाच्या १०१ क्रमांकावर फोन केला. परंतु थोड्याच वेळात पांढऱ्या कारसोबतच इतर तीन कारनेही पेट घेतला. यात एमएच३१/ सीएम ८६४, एमएच ३१/ डीके २०९३, एमएच३१/सीपी २६९६ व एमएच ३१/टीसी ७७६ क्रमांकाच्या कारचा समावेश असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. शहराच्या इतर भागातही रात्री उशिरा वा पहाटेच्या सुमारास घरासमोर अथवा अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वाहनातील पेट्रोलची चोरी करून आग लावण्याचे प्रकार घडत आहे. काही महिन्यापूर्वी सदर भागातील मोहननगर, अजनी पोलिसांच्या हद्दीतील मानेवाडा भागात रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)