उपमहापौरपदासाठी चार उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: April 29, 2016 03:07 IST2016-04-29T03:07:53+5:302016-04-29T03:07:53+5:30
२ मे रोजी होणाऱ्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत.
_ns.jpg)
उपमहापौरपदासाठी चार उमेदवार रिंगणात
नागपूर विकास आघाडीतर्फे होले : जग्याशी, लोखंडे व नागुलवार मैदानात
नागपूर : २ मे रोजी होणाऱ्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. सभागृहातील संख्याबळाचा विचार करता नागपूर विकास आघाडीचे सतीश होले यांची निवड निश्चित आहे. परंतु काँग्रेसचे सुरेश जग्याशी, बसपाचे सागर लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नागुलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप नेते सुनील अग्रवाल यांना उपमहापौर करण्याच्या विचारात होते. परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर नाराजीमुळे गेल्या चार वर्षापासून सभागृहात शांत बसणारे सतीश होले यांनी उपमहापौर होण्याची इच्छा व्यक्त केली. निवडणुका विचारात घेता नाराजी दूर करण्यासाठी होले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गेल्या निवडणुकीत होले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते स्थायी समितीचे सदस्य होेते. सध्या त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी नाही.
दुसरीकडे उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये इच्छूक नसल्याने त्यांची या पदावर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. सतीश होले यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले तर काँग्रेस, बसपा व राकाँच्या उमेदवारांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)