एकाच रात्री चार घरफाेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:52+5:302021-07-18T04:07:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : चाेरट्यांनी बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यांनी बाेथली व ...

एकाच रात्री चार घरफाेड्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : चाेरट्यांनी बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यांनी बाेथली व परिसरात एकाच रात्री चार ठिकाणी घरफाेडी करीत ६० हजार ७०० रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री घडली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाेरट्यांनी सुरुवातीला सतीश राऊत, रा. रेवतकर ले-आऊट, बोथली, ता. नागपूर (ग्रामीण) यांच्या घरात प्रवेश केला आणि दाेन हजार रुपये राेख ५८ हजार ७०० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६० हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. घटनेच्या वेळी सतीश राऊत कामावर गेले हाेते तर, त्यांच्या पत्नी एकट्याच असल्याने त्या शेजारी झाेपायला गेल्या हाेत्या. चाेरट्यांनी अन्य तीन ठिकाणी घरफाेड्या केल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, पाेलिसांनी दुजाेरा दिला आहे. मात्र, चाेरी नेमकी कुणाच्या घरी झाली आणि किती रुपयांचा मुद्देमाल चाेरीला गेला, हे मात्र कळू शकले नाही. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक आशिष माेरखडे करीत आहेत.
...
गस्त वाढवा
अलीकडच्या काळात बुटीबाेरी शहर व परिसरातील गावांमध्ये भरदिवसा दुचाकी वाहने चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच रात्रीच्या वेळी घरफाेड्या व्हायला लागल्या आहेत. या भागात वास्तव्याला असणाऱ्यांमध्ये कामगारांची संख्या अधिक असून, अनेक जण रात्रपाळीत कामावर जातात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरातील महिला एकट्याच राहत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेत आहे. चाेरट्यांचा याेग्य बंदाेबस्त करण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
170721\img_20210717_165127.jpg
दोन हजार रोख व ५८७०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.