दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:10 IST2021-02-26T04:10:06+5:302021-02-26T04:10:06+5:30
नागपूर : पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला अटक केली. लष्करीबागच्या मोकय्या मैदानावर ते ...

दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक
नागपूर : पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला अटक केली. लष्करीबागच्या मोकय्या मैदानावर ते ही तयारी करीत होते.
अटकेतील आरोपींमध्ये शारिक सिराज खान (२१, मोमिनपुरा), मो. मुशफिक शकील खान (२५, गांजाखेत चौक), मो. साहिल मो. रिजवान (२१, मोतीबाग), अंकुश नरेश मसराम (२८, खदान, गोंडवाना चौक) यांचा समावेश आहे. त्यांचा सहकारी अन्ना ऊर्फ शाहरुख अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी आरोपींकडून दोन तलवारी, एक कोयता, गुप्ती, नायलॉन दोरी, कार यासह ६ लाख १ हजार १२० रुपये जप्त केले. रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान पोलिसांची गस्त सुरू असताना लष्करीबागच्या श्री साई उज्ज्वल पॅकिंग कारखान्याजवळ संशयास्पद स्थितीत कारमध्ये बसलेले ते दिसले. पोलिसांनी घेराव करून चौकशी केली. ही कारवाई ठाणेदार किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ए.आर. शिंदे, एएसआय रहमत शेख, हवालदार विजय यादव, भीमराव बांबल, जितेंद्र खरपुरिआ आदींनी केली.