सट्टापट्टीचा अवैध धंदा करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:14+5:302021-02-06T04:13:14+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, भिष्णूर, थंडीपवनी, अंबाडा, सायवाडा, मोवाड, नरखेड अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे ...

सट्टापट्टीचा अवैध धंदा करणाऱ्या चौघांना अटक
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, भिष्णूर, थंडीपवनी, अंबाडा, सायवाडा, मोवाड, नरखेड अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. यासंदर्भात वृत्त प्रकाशित करीत ‘लोकमत’ने पोलिसांनी लक्ष वेधले. याची दखल घेत पोलीस अॅक्शन मोडवर आले असून, सट्टापट्टीचा अवैध धंदा करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. जलालखेडा येथील रामगाव रीठी शिवारात पांदण रस्त्यावर लिंबाच्या झाडाजवळ सट्टापट्टी सुरू असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून राजा विठोबा वाघमारे (वय ४५, रा. आमनेर, ता. वरुड), गजानन वासुदेव काटोलकार (३०, रा. जलालखेडा), विलास गणपत सोनुले (३४, रा. आमनेर) व सट्टापट्टी घेणारा प्रमोद वसंतराव बोरकर (४०, रा. आमनेर, ता. वरूड) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व १२०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई ठाणेदार मंगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुणाल अरगुडे, मंगेश नासरे, पोलीस शिपाई शंकर आचट, चेतन राठोड यांनी केली.