शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांचे निस्सिम सेवक हरपले, डॉ. भाऊ झिटे यांचे देहावसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:48 IST

वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे पाईक व नागपूर-अमरावती मार्गावरील दाभा येथील आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे १२ सप्टेंबर २०२३ रोजी हृदयविकाराने वयाच्या ९३ व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्यावर आंतरभारती आश्रम दाभा सायंकाळी ४ वा आश्रमातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यातील पाचगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात २० नोव्हें. १९३० रोजी जन्मलेले डॉ.भाऊ झिटे यांनी वर्ध्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तरुण वयातच झालेल्या क्षयरोगाच्या उपचारासाठी ते नागपूरच्या डॉ. गुमास्ताकंडे दाखल झाले. उपचारानंतर भाऊ गुमास्ताकंडे डिस्पेंसर म्हणून काम करू लागले. सन १९५९ मध्ये दाभा येथे एकेकाळी माळरान असलेल्या आजच्या आश्रमाच्या दहा एकर जागेवर आंतरभारती आश्रमाची स्थापना केली. आंतरभारती आश्रमात अनेक उपक्रम चालतात.

१९७५ मध्ये भाऊंनी आंतरभारती होमिओपॅथीचे महाविद्यालय सुरू केले होते. आश्रम केवळ वैद्यकीय सेवेसाठीच नव्हे तर, योगशिक्षण, निसर्गोपचार आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांत संपूर्ण विदर्भात सेवाभावी आश्रमाचा आदर्श म्हणून प्रसिद्धीस आला आहे. गोपालन आणि स्वावलंबन वस्त्रनिर्मिती हे प्रकल्पही ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविले जातात.

वर्धापन दिनी विश्वशांती संदेश यात्रा

१४ फेब्रुवारी हा आंतरभारती आश्रमाचा वर्धापनदिन असतो. दरवर्षी आश्रमात १४ फेब्रुवारीला विश्वशांती संमेलन साजरे केले जाते. दीड ते दोन हजार लोक एकत्र येतात. विश्वशांती संदेश यात्रा काढली जाते.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर