शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा स्थापना दिवस : नागपुरातून ५,००० कार्यकर्ते जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:45 IST

येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस महाराष्ट्र  प्रदेशच्यावतीने मुंबई येथे साजरा केला जात आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित पक्षाचा स्थापना दिवस व कार्यकर्ता मेळाव्यात राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपुरातूनही ५,००० च्यावर कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देमुंबई येथे कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस महाराष्ट्र  प्रदेशच्यावतीने मुंबई येथे साजरा केला जात आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित पक्षाचा स्थापना दिवस व कार्यकर्ता मेळाव्यात राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपुरातूनही ५,००० च्यावर कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.कार्यकर्ता मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय  अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. शहरातून २,५०० कार्यकर्ते खासगी वाहनाद्वारे मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत. उर्वरित २,५०० च्यावर कार्यकर्त्यांसाठी अजनी स्थानकावरून विशेष रेल्वेगाडी बुक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोहळे यांच्यासह आमदार सुधाकर देशमुख, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, महापौर नंदा जिचकार, मनपा सत्तापक्ष नेता संदीप जोशी, युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाकडे विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, भाजपा शहर महामंत्री संदीप जाधव, सुनील मानेकर, जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर