कृषी सुधारण्यासाठी 'गो कृषी वाणिज्यम्' हे सूत्र महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:38+5:302021-06-16T04:10:38+5:30
- दिनेश कुळकर्णी : ग्रामायण कृषी प्रबोधन अभियानाचा समारोप नागपूर : चुकीच्या धोरणामुळे भारतात शेतीची दशा बिकट झाली आहे. ...

कृषी सुधारण्यासाठी 'गो कृषी वाणिज्यम्' हे सूत्र महत्त्वाचे
- दिनेश कुळकर्णी : ग्रामायण कृषी प्रबोधन अभियानाचा समारोप
नागपूर : चुकीच्या धोरणामुळे भारतात शेतीची दशा बिकट झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी 'गो कृषी वाणिज्यम्' हे सूत्र स्वीकारण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी यांनी केले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कृषी प्रबोधन अभियानाच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते.
इंग्रजांनी शेतीकडे केवळ कच्च्या मालाचा पुरवठा म्हणून बघितले. त्यामुळे, गावांमधील शेतीशी संबंधित उद्योग-व्यवसाय नष्ट झाले. बेरोजगारी वाढली. स्वातंत्र्यानंतर शेतीवर अनावश्यक असे तंत्रज्ञान थोपले गेले. त्याचा तोटाच जास्त झाला. त्याचा परिणाम भारतात ८६ टक्के शेतकरी अल्प-अत्यल्प भूधारक असतानाही जगात सर्वांत जास्त ट्रॅक्टर भारतात आहेत. त्याचा परिणाम वर्षभर हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांवर ओझे ठरले आहेत. त्यामुळे, शेतीचे स्वरूप शेती व पशुपालन असे असावे. यामुळे शेतीची कामे होतील आणि शेतकऱ्यांना खत व कीटकनाशकांबाबतचे परावलंबित्त्व कमी होईल, असे दिनेश कुळकर्णी म्हणाले. प्रास्ताविक अनिल सांबरे यांनी केले.
...............