धुळवडीत माजी सैनिकाने केला गोळीबार

By Admin | Updated: March 14, 2017 16:03 IST2017-03-14T16:03:30+5:302017-03-14T16:03:30+5:30

होळीची राखड साफ करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात माजी सैनिकाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

A former soldier fired in Dhulevadi | धुळवडीत माजी सैनिकाने केला गोळीबार

धुळवडीत माजी सैनिकाने केला गोळीबार

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 14 -  होळीची राखड साफ करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात माजी सैनिकाने हवेत गोळीबार केला. सोमवारी रात्री 6.45 वाजता ही घटना घडली आहे.  यामुळे मानकापुरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
श्रीनिवास कामेश्वर सिंग (वय ४६) हा मानकापूरच्या विठ्ठलरुक्मीणी नगरात राहतात. ते माजी सैनिक आहे. नागपुरात श्री सिक्युररिटी एजन्सी नावाने तो सुरक्षा एजंसीही चालवतात.  त्याच्या शेजारी असणा-या राजाराणी मंगल कार्यालयासमोर रविवारी रात्री होळी पेटवली. 
पूजा-अर्चना झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून या ठिकाणी शेजारी रंग खेळले. सायंकाळी  सिंग याच्या शेजारी राहणारे ओंकार गंगाधर तिवसकर यांनी होळीची राखड साफ करण्यासाठी पाईपने पाणी फवारले. त्यामुळे राखडीसह पाण्याचा लोट सिंग यांच्या अंगणात (दारासमोर) साचला. यावरून श्रीनिवास चिडले. व ते शेजा-यासोबत वाद घालून अर्वाच्य भाषा वापरत धमकी देऊ लागले. त्यामुळे ओंकार गंगाधर तिवसकर आणि अन्य शेजारी गोळा झाले. 
बाचाबाचीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्यानंतर सिंग  घराच्या बाल्कनीत आले व  १२ बोअरची बंदूक काढून गोळीबार केला. सुदैवाने यात दुखापत झाली नाही. मात्र, गोळीबारामुळे परिसरात प्रचंड दहशत आणि तणाव  निर्माण झाला. अल्पावधीतच राजाराणी मंगल कार्यालयासमोर मोठी गर्दी जमली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार भटकर, उपनिरीक्षक मिथीलेश त्रिपाठी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही गटातील मंडळींना  पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहचले. 
ठाण्यातही दमदाटी 
श्रीनिवास सिंग हे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत होते. स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळणा-या इतर लाभांसोबतच त्याला स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना मिळाला.  गरम डोक्याचा असलेल्या सिंग याचे शेजा-यांसोबत फारसे पटत नाही. त्याने गोळीबार करण्यापूर्वी शेजा-यांना दमदाटीही केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही त्याची दमदाटी सुरूच होती. शेजारी राहणारे ओंकार गंगाधर तिवसकर आणि अन्य काहींनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण स्वसंरक्षणासाठी फायर केल्याचे तो सांगत होता.  परिसरातील नागरिकांचे बयान नोंदवून घेतल्यानंतर  गजेंद्र पांडूरंग राऊत (वय ३४) यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सोबतच त्याने दिलेल्या तक्रारीवरून तिवसकर आणि अन्य सहा जणांविरुद्धही गुन्हा दाखल केला.

Web Title: A former soldier fired in Dhulevadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.