शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे माजी आमदार कृष्णराव पांडव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 20:59 IST

माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव (८८) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राजकीय व शैक्षणिक वर्तुळात त्यांनी मौलिक कार्य केले होते. नगरसेवक ते आमदार ही त्यांची कारकीर्द अतिशय प्रेरणादायी ठरली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्ष अनुभवी नेत्याला मुकला आहे.

ठळक मुद्देरविवारी अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव (८८) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राजकीय व शैक्षणिक वर्तुळात त्यांनी मौलिक कार्य केले होते. नगरसेवक ते आमदार ही त्यांची कारकीर्द अतिशय प्रेरणादायी ठरली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्ष अनुभवी नेत्याला मुकला आहे.कृष्णराव पांडव यांनी १९६९ साली नगरसेवक पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७० साली ते नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर झाले. त्याच्या पुढील वर्षातच स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले व १९७३ साली ते शहराचे महापौरदेखील झाले. त्यानंतर १९८२ ते १९९४ या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषेदेचे ते सलग १२ वर्ष सदस्य होते. काँग्रेस पक्षातदेखील त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. १९८१ साली ते जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम बघितले. २००० पासून ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेसच्या संघटन मजबुतीवर भर दिला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वसंतराव साठे, निर्मला देशपांडे यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होतेराजकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातदेखील त्यांनी मोठे काम केले. सन्मार्ग शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी एक नवीन अध्याय सुरू केला. संस्थेच्या अंतर्गत ४५ शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना केली व गरीब, वंचित, मागासवर्गीय मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यावर भर दिला.रविवारी होणार अंत्यसंस्कारकृष्णराव पांडव यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी १२ वाजता धंतोली येथील निवासस्थानाहून निघेल. त्यानंतर दिघोरी येथील राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात गिरीश व किरण ही दोन मुलं, चार मुली आहेत.

 

टॅग्स :Deathमृत्यूMLAआमदार