माजी आमदार धवड यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 23:28 IST2021-06-03T23:27:38+5:302021-06-03T23:28:13+5:30
Former MLA Dhawad cheated नवोदय बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक शंकरराव धवड (वय ६६) यांना सायबर गुन्हेगाराने एक लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यातून ९८,५०० रुपये काढून घेतले. २२ मेच्या सकाळी ही खळबळजनक घडामोड घडली.

माजी आमदार धवड यांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नवोदय बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक शंकरराव धवड (वय ६६) यांना सायबर गुन्हेगाराने एक लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यातून ९८,५०० रुपये काढून घेतले. २२ मेच्या सकाळी ही खळबळजनक घडामोड घडली.
२२ मेच्या सकाळी ९.१४ वाजता धवड त्यांच्या नवोदय निर्मल अपार्टमेंटसमोरच्या निवासस्थानी हजर असताना त्यांना एक मेसेज आला. त्यात असलेली लिंक बँकेची आहे, असे समजून धवड यांनी ती उघडून त्यात आपली माहिती नमूद केली. त्यानंतर आरोपीने फोन करून धवड यांच्याकडून बँक खात्याशी संबंधित माहिती घेतली आणि तीनवेळा वेगवेगळी रक्कम असे एकूण ९८,५०० रुपये लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर धवड यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.