शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपुरात माजी आमदाराच्या बंगल्यात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:11 IST

माजी आमदार आशिष देशमुख यांच्या बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा सदर पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला. चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले.

ठळक मुद्देहिरे आणि सोन्याचे दागिने लंपास सदर पोलिसांनी लावला दोन तासात छडा : दागिने जप्त, चोरटा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी आमदार आशिष देशमुख यांच्या बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा सदर पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला. चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले.देशमुख यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बरकत’ बंगला आहे. आयुषी आशिष देशमुख (वय ४३) यांनी त्यांचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने गुरुवारी दुपारी १.३० वाजता बेडरूमच्या बाजूला असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवले. शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता त्यांनी ड्रावर उघडून बघितले तेव्हा त्यात त्यांना दागिने दिसले नाही. त्यांनी आजूबाजूचे सर्व ड्रावर, लॉकर तपासले. मात्र दागिने काही मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबीयांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बंगल्यात दुसऱ्या व्यक्तीचे शयनकक्षापर्यंत येणे शक्य नसल्याने घरातीलच नोकरापैकी कुणीतरी ही चोरी केली असावी, असा संशय आयुषी यांनी व्यक्त केला. ठाणेदार महेश बनसोडे यांनी तक्रार मिळताच धावपळ सुरू केली. देशमुख यांच्या घरी किती आणि कोण कोण काम करतात, त्या सर्वांनाच ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. यापैकी बंगल्यात साफसफाईचे काम करणारा सागर प्रकाश बावणे (वय २२, रा. दसरा रोड, महाल) याने चोरीची कबुली दिली. त्याने तो ऐवज स्वत:च्या घरात दडवून ठेवल्याचेही पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लगेच त्याला घेऊन त्याचे घर गाठले. सागरने त्याच्या घरात एका ठिकाणी हे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने लपवून ठेवले होते. ते जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली.शानशौकीन करण्यासाठी चोरीगरिबीत जगणाऱ्या सागरच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या सागरला त्याचे मित्र, आजूबाजूची मंडळी शानशौकीनने जगत असल्याने त्यालाही मौजमजा करण्याची इच्छा होती. मजुरीच्या पैशातून हे शक्य नसल्याचीही त्याला खात्री पटली होती. गुरुवारी बंगल्यात साफसफाई करताना त्याला ड्रेसिंग टेबलचे ड्रावर उघडे दिसले. सहज उघडले असता त्यात हिरे आणि सोन्याचे दागिने दिसले. त्यामुळे त्याची मती फिरली आणि त्याने ही चोरी केली. महिनाभरापूर्वीच तो देशमुख यांच्याकडे कामाला लागला होता, असे पोलीस सांगतात.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखtheftचोरी