शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढील अडचणी वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:14 IST

राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पाचे कंत्राट बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळवून देण्यात पवार यांची काय भूमिका होती, हे तपासले जात आहे. त्यावेळी पवार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.

ठळक मुद्देसिंचन घोटाळ्यात तपास सुरू : भूमिकेचा शोध घेतला जातोय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पाचे कंत्राट बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळवून देण्यात पवार यांची काय भूमिका होती, हे तपासले जात आहे. त्यावेळी पवार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात कंत्राटदार अतुल जगताप यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. पवार व कंपनीचे संचालक माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पांची कंत्राटे मिळवून दिली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने या प्रकरणात पवार यांची काय भूमिका आहे, अशी विचारणा केली होती. त्यामुळे ही माहिती न्यायालयाला देण्यात आली. टेंडर मंजूर करणे, मोबिलायझेशन अ‍ॅडव्हान्स देणे व कार्यादेश जारी करणे यात पवार यांची भूमिका तपासली जात आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित, पवार यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रसाद ढाकेफाळकर तर, बाजोरिया कंपनीतर्फे अ‍ॅड. ए. वाय. साखरे यांनी बाजू मांडली.बाजोरिया कन्स्ट्रक्शन अपात्रबाजोरिया कन्स्ट्रक्शनकडे जिगाव प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्याची पात्रता नव्हती, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. पात्रतापूर्व निरीक्षक समितीने कंपनीला बेकायदेशीर फायदा दिला. त्यामुळे समितीच्या सहा सदस्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच, अन्य गैरप्रकारासाठी इतर संबंधित अधिकाºयांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. संदीप बाजोरिया, त्यांचे बंधू सुमित व वडील रमेशचंद्र यांना तपासण्यात आले आहे. सुमित यांच्याकडे कंपनीची पॉवर आॅफ अटर्नी आहे.विस्तृत प्रतिज्ञापत्र देण्याचा आदेशप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रात एकाच प्रकल्पाची माहिती देण्यात आल्यामुळे न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तसेच, बाजोरिया कन्स्ट्रक्शनकडील जिगावसह इतर तीन प्रकल्पांच्या चौकशीवर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश सरकारला दिला. या आदेशाचे पालन न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, अशी तंबीही सरकारला दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCorruptionभ्रष्टाचार