वन विभागाची बोगस जाहिरात!
By Admin | Updated: July 24, 2015 02:36 IST2015-07-24T02:36:25+5:302015-07-24T02:36:25+5:30
महाराष्ट्र वन विभागाच्या नावाने बोगस संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करू न त्यावर पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे.

वन विभागाची बोगस जाहिरात!
वेबसाईटही तयार : वन अधिकाऱ्यांची झोप उडाली
नागपूर : महाराष्ट्र वन विभागाच्या नावाने बोगस संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करू न त्यावर पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे, या बोगस वेबसाईटवर ‘महाराष्ट्र वन विभाग’असा ठळक अक्षरात उल्लेख करण्यात आला आहे.
त्यामुळे ती जाहिरात बघितल्यानंतर कुणालाही बोगस असल्याशी शंका येत नाही. या वेबसाईटने वन अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे.
या बोगस संकेतस्थळावर पद भरती प्रक्रि येविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ही सरळ पद भरती असल्याचा उल्लेख करू न याद्वारे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) मुंबई कार्यालयासाठी गट-क संवर्गातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय यासाठी २२ जुलै २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत आॅनलाईन कागदपत्र व बँक आॅफ इंडियाच्या खाते क्र. ०७५३१०११०००७४१८ यावर ५०० रुपये जमा करावे, अशा सूचना दिल्या आहेत. सोबतच संबंधित व्यक्तीने ७३८७३९७५३२ असा मोबाईल क्रमांकही दिला आहे. या बोगस जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना फसविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे वन विभागाने या बोगस संकेत स्थळावरील पद भरतीशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करू न, त्याची वन विभाग चौकशी करीत असल्याचे सांगितले आहे; सोबतच कुणीही या बोगस जाहिरातीला बळी पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी वन विभागाचे प्रभारी माहिती व प्रसिद्धी अधिकारी नाईक यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वन विभागातील एका वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या बोगस वेबसाईटचा भंडाफोड केला असल्याचे सांगितले. शिवाय ‘लोकमत’ प्रतिनिधीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता पुढील व्यक्तीने पद भरतीसाठी कागदपत्र जमा करण्याची मुदत संपली असल्याचे सांगून फोन कट केला.(प्रतिनिधी)