मिहानमध्ये वाघाच्या शोधात वनविभाग : कॅमेरा ट्रॅपची संख्या ३० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:55 PM2019-11-19T23:55:10+5:302019-11-19T23:56:53+5:30

मिहान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मंगळवारी कॅमेऱ्याची संख्या वाढवून ३० वर नेली आहे.

Forest Department in search of tiger in Mihan: Number of camera traps above 30 | मिहानमध्ये वाघाच्या शोधात वनविभाग : कॅमेरा ट्रॅपची संख्या ३० वर

मिहानमध्ये वाघाच्या शोधात वनविभाग : कॅमेरा ट्रॅपची संख्या ३० वर

Next
ठळक मुद्देदर्शनी ठिकाणांवर उपायांसाठी बॅनर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मंगळवारी कॅमेऱ्याची संख्या वाढवून ३० वर नेली आहे. तसेच वन कर्मचाऱ्यांच्या चमूला दिवस-रात्र गश्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वन विभागाने मिहान परिसरात कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्याला पत्र जारी केले आहे. कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय परिसरालगतच्या गावांमध्ये जाऊन वन कर्मचारी गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगत आहेत.
विशेषत: परिसर आणि लगतच्या दर्शनीय स्थळांवर उपाययोजना संदर्भात बॅनर लावण्यात आले आहेत. परंतु मंगळवारी कोणत्याही कॅमेऱ्यात वाघ दिसला नाही. काही दिवसांपूर्वी मिहानच्या इन्फोसिस कंपनीजवळ पट्टेदार वाघ दिसल्याचा दावा स्थानिक कर्मचाऱ्यांनी केला होता. शनिवारी परिसरात ओल्या मातीत वाघाचे पगमार्क दिसले होते. त्यानंतर सेमिनरी वन परिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू चमूने अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान शौचासाठी गेलेल्या काही मजूरांनी कंपनीच्या मागील भागात पट्टेदार वाघ दिसल्याची माहिती दिली होती. परंतु वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी गेल्यानंतर वाघ दिसला नाही.
शनिवारी रात्री घटनास्थळाजवळ ५ कॅमेरे लावण्यात आले. पण रविवारी रात्री १० वाजता एका कॅमेऱ्या ट्रॅपमध्ये वाघाचे चित्र कैद झाले. त्यानंतर डीसीएफ प्रभुनाथ शुक्ल, एसीएफ काळे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, आरएफओ विजय गंगावने यांनी परिसरात कंपन्यांमध्ये उपाययोजनासंदर्भात कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती.

Web Title: Forest Department in search of tiger in Mihan: Number of camera traps above 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.