वाडीत विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:34+5:302021-05-15T04:08:34+5:30

वाडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे वाडीतील सर्व मार्केट बंद आहेत. शुक्रवारी रमजान ईदच्या दिवशी तगडा ...

Foreign liquor confiscated in Wadi | वाडीत विदेशी दारू जप्त

वाडीत विदेशी दारू जप्त

वाडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे वाडीतील सर्व मार्केट बंद आहेत. शुक्रवारी रमजान ईदच्या दिवशी तगडा पोलीस बंदोबस्त असतानाही शहरात विदेशी दारूची विक्री करताना वाडी पोलिसांनी एकास अटक केली. प्राप्त माहितीनुसार पूर्वा हाइट्स बिल्डिंग, खडगाव रोडच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान आकाश भोयर अवैधरीत्या दारू विकत असल्याची माहिती वाडी पोलिसांना मिळाली. यानंतर पीएसआय अविनाश जायभाये यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत आकाश भोयरला दारू विकताना रंगेहात पकडले. अंदाजे १५ हजार ५१० रुपयांची विदेशी दारू व ॲक्टिव्हा मोपेड क्र. एम.एच.४०/ एएस १८७९ किंमत अंदाजे ३० हजार असा एकूण ४५ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी आरोपीस अटक करून दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाजे यांच्यासह गणेश मुंढे, रवींद्र सतोकर करीत आहेत.

Web Title: Foreign liquor confiscated in Wadi