पुणतांबा येथील शेतकऱ्यांचा सत्कार

By Admin | Updated: July 5, 2017 02:09 IST2017-07-05T02:09:42+5:302017-07-05T02:09:42+5:30

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ‘शेतकरी संपा’ची हाक देणाऱ्या पुणतांबा (जिल्हा अहमदनगर) येथील शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काटोल येथे मंगळवारी दुपारी आयोजित....

Fond of farmers in Puntamba | पुणतांबा येथील शेतकऱ्यांचा सत्कार

पुणतांबा येथील शेतकऱ्यांचा सत्कार

काटोल येथे कार्यक्रम : राष्ट्रवादीतर्फे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ‘शेतकरी संपा’ची हाक देणाऱ्या पुणतांबा (जिल्हा अहमदनगर) येथील शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काटोल येथे मंगळवारी दुपारी आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती शेतकऱ्यांमध्ये सर्जेराव जाधव, दत्ताजी गायकवाड, बापूसाहेब आढाव व बाबासाहेब चव्हाण यांच्या समावेश आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आ. सुनील शिंदे, शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले, हरिभाऊ केदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या शेतकरी संपाला राज्यभर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परिणामी, सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. परंतु, भाजप सरकारने दिलेली ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यक्रमाला सतीश शिंदे, दीपक मोहिते, पुरुषोत्तम धोटे, प्रताप ताटे, तारकेश्वर शेळके, चंद्रशेखर चिखले, बंडू काळे, नीळकंठ ढोरे, बापूराव सातपुते, अनूप खराडे, अंगत भैस्वार, भूषण सावरकर, बबन लोहे, वसंत चांडक, नरेश अरसडे, अनिल ढोणे यांच्यासह काटोल, नरखेड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Fond of farmers in Puntamba