कडक लॉकडाऊन टाळण्यासाठी नियम, शिस्त पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:09 IST2021-03-08T04:09:14+5:302021-03-08T04:09:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण ...

Follow the rules, discipline to avoid strict lockdown | कडक लॉकडाऊन टाळण्यासाठी नियम, शिस्त पाळा

कडक लॉकडाऊन टाळण्यासाठी नियम, शिस्त पाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासनाने काढले आहेत. शिवाय नागरिकांनीही आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले होते. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. कडक लॉकडाऊन टाळण्यासाठी आदेशाचे काटेकोरपणे पालन करा, शिस्त पाळा, असे आवाहन केले आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील बाजारांचा दौरा केला. भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत दुकानदारांना आणि ग्राहकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. नागरिकांनी स्वत:च्या जिवासाठी काळजी घ्यायला हवी. कोरोनाचा कॅरिअर हा नागरिकच आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी किमान शनिवार, रविवारी बंदच्या दिवशी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही महापौरांनी केले.

मांस, मटण विक्रीची दुकाने शनिवारी, रविवारी सुरू ठेवण्याचे प्रशासनाच्या आदेशात नमूद होते. तरीही काही ठिकाणी पोलिसांनी मांस, मटण विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली. याबाबतचे गैरसमज दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Follow the rules, discipline to avoid strict lockdown