काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:32+5:302021-04-17T04:08:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर व सक्तीने पालन करावे. या उपाययाेजनांचे ...

काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर व सक्तीने पालन करावे. या उपाययाेजनांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व प्रसंगी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नरखेडचे ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिला. माेवाड (ता. नरखेड) शहरात रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असून, पाेलिसांची गस्त व बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंतच्या काळात संचारबंदी तसेच दिवसा ८ ते रात्री ८ या काळात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या असून, किराणा, भाजीपाला व औषधांची दुकाने व दवाखाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्यात काही मंडळी टाळाटाळ करीत असल्याने पाेलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. गस्तीवर असलेले पाेलीस कर्मचारी वेळ झाल्यानंतर दुकानदारांना सक्तीने दुकाने बंद करायला लावतात, तर विनाकारण फिरणाऱ्यांसह मास्क न वापरणाऱ्यांनी विचारणा करीत आहेत.
दरम्यान, कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडताना मास्कचा व्यवस्थित वापर करावा, औषधे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दुकानासमाेर गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कुणीही राेडवर विनाकारण फिरू नये, लक्षणे आढळून आल्यास न घाबरता काेराेना चाचणी करवून घ्यावी, पाेलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी केले आहे. माेवाड शहरातील गस्त व बंदाेबस्ताची जबाबदारी दिलीप मसराम, सोनोने, महाजन, मुज्जू शेख, मिलिंद राठोड यांच्यासह इतर पाेलीस कर्मचारी सांभाळत आहेत.