बालकलावंतांनी सादर केल्या लोककला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST2021-05-05T04:11:14+5:302021-05-05T04:11:14+5:30
- बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘वारसा लोककलेचा’ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक ...

बालकलावंतांनी सादर केल्या लोककला
- बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘वारसा लोककलेचा’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने महाराष्ट्रदिनी ‘वारसा लोककलेचा’ सादर झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरिश्चंद्र बोरकर व आभा मेघे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बालकलावंतांनी महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन घडवले. त्यात छत्रपतींची स्तुती, गोंधळ, पोवाडा, लावणी, नमन, कीर्तन, गौळण, खंजरी भजन, अभिनय आदींचा समावेश होता. अंसिका नाईक, अर्णव देशपांडे, सर्वश्री जुनघरे, मृण्मयी मोहरिल, पारूल कडू, सांची कांबळे, रुद्र बांडागळे, ऋग्वेद कुळकर्णी, आदित्य बडमे, शौर्या निंबाळकर, शिवानंद वसाके, देवांश क्षीरसागर, स्वरश्री नाईक, भक्ती चौधरी, हर्षल डांगे, शिवानंद बोथे, राधेय इंगळे, विश्वा बांबल या बालकलावंतांनी या कला सादर केल्या. निवेदन रूपाली कोंडेवार मोरे व अवंती लाटणकर यांनी केले. प्रास्ताविक आभा मेघे यांनी केले तर आभार नितीन पात्रीकर यांनी मानले. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह उपस्थित होते.
.................