ग्राहकांना स्वस्त वीज देण्यावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST2021-03-13T04:15:06+5:302021-03-13T04:15:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादनावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे ...

ग्राहकांना स्वस्त वीज देण्यावर भर द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादनावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी शुक्रवारी कोराडी औष्णिक वीज केंद्राची पाहणी केली. त्यानंतर ते महाजेनकोच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होते. या वेळी त्यांनी रेकॉर्ड वीज उत्पादन केल्याबद्दल महाजेनकोचे कौतुकही केले.
या वेळी महाजेनकोचे प्रबंध निदेशक संजय खंदारे, संचालक (खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक (प्रकल्प) व्ही. थंगापांडीयन, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक अभय हरणे, संजय मारुडकर, कैलाश चिरुटकर, नितीन चांदूरकर, मुख्य अभियंता राजेश पाटील, अनिल आष्टीकर, राजेश कराडे, गिरीश कुमरवार उपस्थित होते.
या वेळी ते म्हणाले, केंद्र सरकार खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. यासाठी व्यावसायिक पद्धतीने काम करीत खर्च कमी करावा लागेल. यापूर्वी ऊर्जामंत्र्यांनी कोराडी येथील युनिट क्रमांक ८, ९ व १० येथील नियंत्रण कक्षाची व वीज केंद्राच्या मॉडेलची पाहणी केली.
----------