वन विभागाची कार्यक्षमता वाढविण्यावर भर
By Admin | Updated: July 21, 2014 00:56 IST2014-07-21T00:56:28+5:302014-07-21T00:56:28+5:30
वन विभागाच्यावतीने राज्य पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापनाच्या (स्टेट कॅम्प) माध्यमातून वन्यजीव विभाग, कार्य आयोजना, वनविकास महामंडळ व प्रादेशिक वनवृत्तातील वन अधिकाऱ्यांसाठी

वन विभागाची कार्यक्षमता वाढविण्यावर भर
दोन दिवसीय कार्यशाळा : वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग
नागपूर : वन विभागाच्यावतीने राज्य पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापनाच्या (स्टेट कॅम्प) माध्यमातून वन्यजीव विभाग, कार्य आयोजना, वनविकास महामंडळ व प्रादेशिक वनवृत्तातील वन अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गत १८ व १९ जुलै दरम्यान हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये ती पार पडली.
या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख ए. के. सक्सेना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. निगम, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) मैफुल हुसेन, सामाजिक वनीकरणाचे महानिरीक्षक डॉ. ए. के. झा, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) डॉ. ए. एस. के. सिन्हा उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत हैदराबाद येथील सेंटर फॉर आॅर्गनायझेशन डेव्हलपमेंट संस्थेचे डॉ. व्ही. एन. श्रीवास्तव यांनी वन विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यनिर्वाह क्षमतेत सुधारणा करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे महानिरीक्षक ए. के. झा व वनबल प्रमुख ए. के. सक्सेना यांनीही वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट केले. कार्यशाळेचे संचालन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एस. जी. टेंभूर्णीकर यांनी केले. (प्रतिनिधी)