फुले दाम्पत्य सन्मान दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:10+5:302021-01-03T04:10:10+5:30

काेराडी : स्थानिक रामकृष्ण कला व वाणिज्य महाविद्यालयात सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन काॅन्व्हेंट व हायस्कूल व ...

Flowers honor the couple | फुले दाम्पत्य सन्मान दिन

फुले दाम्पत्य सन्मान दिन

काेराडी : स्थानिक रामकृष्ण कला व वाणिज्य महाविद्यालयात सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन काॅन्व्हेंट व हायस्कूल व रामकृष्ण कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फुले दाम्पत्य सन्मान दिनानिमित्त शुक्रवारी (दि. १) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मारोती वाघ, संचालिका तथा प्राचार्या लता वाघ, प्रा. वसंता हिवरकर, प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते. डॉ. मारोती वाघ व प्राचार्या लता वाघ यांनी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. शिवाय, भााषणांमधून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला प्रा. विजय वनकर, विद्या गजभिये, लीला वाघ, कलावती हिवरकर, कुणाल ठाकरे, प्रियंका ठाकूर, अर्चना साऊरकर, पूनम वाघ यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित हाेते. कार्यक्रमात काेराेना उपययाेजनांचे काटेकाेर पालन करण्यात आले हाेते.

Web Title: Flowers honor the couple