नागपूर-मुंबईदरम्यान उड्डाणे आता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:30 AM2020-06-17T10:30:32+5:302020-06-17T10:32:19+5:30

मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती.

Flights between Nagpur and Mumbai will now increase | नागपूर-मुंबईदरम्यान उड्डाणे आता वाढणार

नागपूर-मुंबईदरम्यान उड्डाणे आता वाढणार

Next
ठळक मुद्देमुंबई विमानतळावर १०० विमानांना लॅण्डिंग व टेकऑफची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याची राजधानी मुंबईहून उपराजधानी नागपूरकरिता आता उड्डाणांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती.
सध्या नागपुरात एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर-दिल्ली (सोमवार, गुरुवार व शनिवार), इंडिगो एअरलाईन्सचे पुणे, कोलकाता व दिल्ली आणि गो एअरची नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा उपलब्ध आहे.
गो-एअरच्या विमानासंदर्भात नेहमीच अनिश्चितता असते. परवानगी मिळाल्यानंतरही गो-एअरने उशिरा अर्थात १ जूनपासून नागपुरातून विमानाचे संचालन सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत तीन ते चारदाच विमानाचे संचालन झाले. बहुतांशवेळी कंपनीची उड्डाणे रद्द झाली. मंगळवारी गो-एअरचे नागपूर-मुंबई-नागपूर विमान रद्द झाले.
मुंबई विमानतळावर एकूण १०० विमानांना परवानगी मिळाल्यानंतर इंडिगो एअरलाईन्स मुंबईचे उड्डाण २१ जूनपासून सुरू करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. यासह कंपनी आणखी उड्डाणांमध्ये वाढ करू शकते. विमानांच्या अनिश्चिततेमुळे प्रवासी जास्त अंतराच्या प्रवासाकरिता रस्ता मार्गालाच प्राधान्य देत आहे. यामुळे विमान कंपन्यांना कमी प्रवासी मिळत आहेत. - उड्डाणे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्स एजंटांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनिश्चिततेचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

Web Title: Flights between Nagpur and Mumbai will now increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.