‘एनएचएआय’ बांधणार सदरचा उड्डाण पूल

By Admin | Updated: September 14, 2014 01:09 IST2014-09-14T01:09:38+5:302014-09-14T01:09:38+5:30

सदरमध्ये रेसिडेन्सी रोडचा प्रस्तावित उड्डाण पूल तयार करण्याचे काम नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी (एनएचएआय) करणार आहे. एका महिन्यापूर्वी अ‍ॅथॉरिटीला भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून या कामाबाबतचे पत्र

The flight bridge will be constructed by NHAI | ‘एनएचएआय’ बांधणार सदरचा उड्डाण पूल

‘एनएचएआय’ बांधणार सदरचा उड्डाण पूल

तिसऱ्यांदा ‘डीपीआर’ तयार : भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळाले पत्र
वसीम कुरेशी - नागपूर
सदरमध्ये रेसिडेन्सी रोडचा प्रस्तावित उड्डाण पूल तयार करण्याचे काम नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी (एनएचएआय) करणार आहे. एका महिन्यापूर्वी अ‍ॅथॉरिटीला भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून या कामाबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. अ‍ॅथॉरिटी ३ किलोमिटर लांबीच्या या प्रस्तावित उड्डाण पुलासाठी ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (डीपीआर) तयार करण्याच्या कामाला लागली आहे. या कामासाठी १४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अनेक दिवसांपासून या कामाची नागरिक वाट पाहत होते. सदरचा हा रस्ते हायवे क्रमांक ६९ चा भाग आहे. लिबर्टी टॉकीजपासून छावणीपर्यंत वाहनांची गर्दी आणि दुकाने असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘एनएचएआय’ने रिझर्व्ह बँक चौकातून हा उड्डाणपुल तयार करण्याची तयारी केली आहे. ही जागा शहरातील हायवे क्रमांक ६९ चा सुरुवातीची जागा आहे. येथून पागलखाना चौकापर्यंत उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहे. पूर्वीच्या प्रस्तावित योजनेत लिबर्टी टॉकीजपासून राजभवनापर्यंत हा पूल तयार करण्यात येणार होता.
आधी सुद्धा तयार झाला होता ‘डीपीआर’
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २००७-०८ मध्ये याबाबत ‘डीपीआर’ तयार केला. त्यानंतर प्रस्तावात संशोधन करून पुन्हा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला. एका वषार्नंतर महानगरपालिकेने ‘डीपीआर’ तयार केला. महापालिकेने जेएनएनयुआरएमच्या अंतर्गत निधी मिळविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतू तो मंजूर झाला नाही. त्यानंतर अंदाजे खर्चात वाढ करून संशोधित प्रस्ताव शहर विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. ७ वर्षापूर्वी लिबर्टी टॉकीजपासून राजभवन चौकापर्यंत प्रस्तावित उड्डाण पुलाचा खर्च ५७ कोटी रुपये येणार होता. परंतु सध्या हा खर्च तिप्पट झाला आहे. ‘एमएसआरडीसी’ने पूर्वी प्रस्तावित केल्यानुसार या कामाला दोन वर्षाचा कालावधी लागणार होता.
‘फोर लेन’चा प्रयत्न
शहरात उड्डाण पूल तयार होण्याची ही दुसरी वेळ आहे. सदर येथील मार्ग अतिशय अरुंद आहे. त्यामुळे फोर लेनचा पूल तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भागात जमीन अधिग्रहणाची गरज आहे. महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कामात अडथळा येणार नाही. स्थानिक नागरिकांसोबतही पुलाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ‘रेसिडेन्सी फ्लाय ओव्हर’ तयार करण्याबाबत ‘एनएचएआय’ला भूपृष्ठ विकास मंत्रालयाकडून पत्र मिळाले असून त्याचा ‘डीपीआर’ तयार करण्यात येत आहे.’
-एम. चंद्रशेखर,
प्रकल्प व्यवस्थापक, एनएचएआय

Web Title: The flight bridge will be constructed by NHAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.