नरखेड येथे ठिकठिकाणी ध्वजाराेहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST2021-02-05T04:40:01+5:302021-02-05T04:40:01+5:30
नरखेड : शहरात ठिकठिकाणी ध्वजाराेहण करून प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या हस्ते ...

नरखेड येथे ठिकठिकाणी ध्वजाराेहण
नरखेड : शहरात ठिकठिकाणी ध्वजाराेहण करून प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात सभापती नीलिमा रेवतकर यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी उपसभापती वैभव दळवी, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, पं.स. सदस्य व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी ध्वजाराेहण केले. याप्रसंगी न.प. उपाध्यक्ष अजय बालपांडे, मुख्याधिकारी प्रवीण मानकर, सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. जयस्तंभ चौकात न.प. उपाध्यक्ष अजय बालपांडे यांच्या हस्ते, न.प. हायस्कूल येथे शिक्षण सभापती हरिकांत माळाेदे, हुतात्मा स्मारक उद्यान येथे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, ग्रामको कार्यालयात अध्यक्ष रत्नाकर मडके, भाजपा कार्यालयात संजय कामडे, श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी प्राचार्य डाॅ. जयंत जवंजाळ, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते. मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालयात डाॅ. प्रवीण कोहळे यांनी ध्वजाराेहण केले.