अवैध रेती वाहतुकीचे पाच ट्रक पकडले

By Admin | Updated: May 29, 2014 03:26 IST2014-05-29T03:26:22+5:302014-05-29T03:26:22+5:30

कन्हान नदीतील नेरी रेतीघाटातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक

Five trucks of illegal sand transport were seized | अवैध रेती वाहतुकीचे पाच ट्रक पकडले

अवैध रेती वाहतुकीचे पाच ट्रक पकडले

कामठी : कन्हान नदीतील नेरी रेतीघाटातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक कामठी पोलिसांनी पकडले. या कारवाईत पाचही ट्रक चालकांना कामठी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांचे एक पथक नेरी शिवारात गस्तीवर असताना एमएच-३१/सीक्यू-५३३५, एमएच-४0/एन-१६0९,एमएच-३१/डब्ल्यु-६१४0, एमएच-३१/सीक्यु ७३३५ व जेएच-0१/जी-८४३३ या क्रमांकाचे पाच ट्रक नेरी रेतीघाटातून अवैधरीत्या रेती वाहतूक करीत होते. दरम्यान, सदर पाचही ट्रक पोलिसांनी पकडले. यात राजू दौलत भोयर (३५, रा. आजनी), सुरेश नामदेव मेo्राम (३५, रा. सोनेगाव राजा), खुशाल संतोष सायरे (४३, रा. कन्हान), राजू अखाडू बागडे (३६, रा. नेरी), राजेश धनराज मेहर (२७, रा. नेरी) या ट्रक चालकांविरुद्ध भादंवि कलम ३७९(३४) नुसार गुन्हा दाखल करून पाचही जणांना अटक केली.

या कारवाईत १२ हजार ५00 रुपये किमतीची रेती व १५ लाख रुपये किमतीचे ट्रक असा एकूण १५ लाख १२ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई कन्हानचे प्रभारी ठाणेदार परीविक्षाधीन अधिकारी (आयपीएस) गौरव सिंग व कामठी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष चचेरे, रमेश चहारे, भोजराज बान्ते, रवी अहिर, विजय भगत, सचिन बाळबुधे यांच्या पथकाने केली.

कामठी तालुक्यातील बिना, वारेगाव, नेरी, उनगाव रेतीघाटांचा लिलाव झाला नसतानासुद्धा मोठय़ा प्रमाणात अवैध रेती चोरी सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five trucks of illegal sand transport were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.