अजनीवनातील वृक्षतोडीनंतर पाचपट झाडे लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST2021-06-03T04:07:41+5:302021-06-03T04:07:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अजनी येथे होणाऱ्या इंटरमॉडेल स्टेशनसाठी हजारो झाडे कापण्यात येणार आहेत. जितकी झाडे कापण्यात येतील, ...

Five trees will be planted after deforestation in Ajniwan | अजनीवनातील वृक्षतोडीनंतर पाचपट झाडे लावणार

अजनीवनातील वृक्षतोडीनंतर पाचपट झाडे लावणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनी येथे होणाऱ्या इंटरमॉडेल स्टेशनसाठी हजारो झाडे कापण्यात येणार आहेत. जितकी झाडे कापण्यात येतील, त्याच्या पाचपट अधिक झाडे लावण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अजनीवनातील वृक्षतोडीला प्रचंड विरोध होत असून, या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची भूमिका ट्विटच्या माध्यमातून बुधवारी मांडली.

इंटरमॉडेल स्टेशन ४४.४ एकर जमिनीवर विकसित होणार आहे. त्यासाठी ४ हजार ५२२ झाडे तोडावी लागणार आहेत. तर प्रकल्पातील उड्डाणपूल व त्याला जोडले जाणारे अ‍ॅप्रोच रोड यासाठी ४०८ झाडे कमी होतील. या झाडांच्या बदल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शंकरपूर येथील वनविभागाच्या जमिनीवर पाचपट झाडांची लागवड करेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. अधिक सुविधा, निवासी गाळे, दुकाने या जमिनीवर होणार आहेत. हे सर्व करताना २ हजार २३ झाडे वाचविण्यात आली आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Five trees will be planted after deforestation in Ajniwan