पाच टक्के महिला लैंगिक शोषणाच्या बळी
By Admin | Updated: August 28, 2016 02:10 IST2016-08-28T02:10:40+5:302016-08-28T02:10:40+5:30
आजही भारतामध्ये स्त्रियांच्या इच्छेला दुय्यम स्थान दिले जाते. यामुळे विवाहानंतर पुरुष हा स्त्रीवर अधिकार गाजवतो.

पाच टक्के महिला लैंगिक शोषणाच्या बळी
संगीता रेगे यांची माहिती : आजही पुरुष स्त्रीवर अधिकार गाजवतो
नागपूर : आजही भारतामध्ये स्त्रियांच्या इच्छेला दुय्यम स्थान दिले जाते. यामुळे विवाहानंतर पुरुष हा स्त्रीवर अधिकार गाजवतो. यातून साधारण पाच टक्के स्त्रिया इच्छा नसतानाही लैंगिक शोषणाला बळी पडतात. विशेष म्हणजे, यामुळे आजार होण्याची जोखीम पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक असते, अशी माहिती सेहत संस्थेच्या संशोधक संगीता रेगे यांनी येथे दिली. कौन्सिल आॅफ सेक्स एज्युकेशन अॅण्ड पॅरेंटहूड इंटरनॅशनलच्यावतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या.
रेगे म्हणाल्या, लैंगिक शोषणाला बळी पडलेली अल्पवयीन मुले आणि स्त्रियांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर अभ्यास करण्यासाठी मुंबई मनपाच्या तीन रुग्णालयांमध्ये ‘सेहत’ संस्थेतर्फे संशोधन प्रकल्प राबविला जातो. यात केलेल्या पाहणीतून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. (प्रतिनिधी)