शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाच खून करणारा  क्रूरकर्मा पालटकर मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:39 IST

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ३५) याचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला आज चार दिवस पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देचार दिवस होऊनही हाती लागला नाही : पोलिसांची शोधाशोध सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ३५) याचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला आज चार दिवस पूर्ण झाले आहे.नंदनवनमधील आराधनानगरात राहणारे भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना, मुलगी वेदांती आणि आई मीराबाई तसेच कमलाकर यांचा चार वर्षाचा भाचा कृष्णा पालटकर या पाच जणांची लोखंडी बत्त्याने ठेचून नराधम विवेक गुलाब पालटकर याने निर्घृण हत्या केली होती. हे थरारक हत्याकांड उघडकीस आल्यापासून पालटकर फरार आहे. नंदनवन पोलीस, गुन्हे शाखा तसेच वेगवेगळी शोधपथके या नराधमाचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, चार दिवस होऊनही त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे नागपूरकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मोकाट फिरणारा क्रूरकर्मा कुठे दडून बसला आहे, हा प्रश्न सर्वत्र चर्चेला आला असून, तो आणखी कुणाचा गेम तर करणार नाही ना, अशी भीतीवजा शंकाही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे थरारक हत्याकांड घडवून आणणारा आरोपी हाती लागत नसल्याने पोलिसांवरही दडपण आले आहे. आज आणखी काही पोलीस पथकं आरोपीचा शोध घेण्यासाठी कामी लावण्यात आले आहे.तो सायकोच !दरम्यान, पोलिसांनी त्याचा छडा लावण्यासाठी मध्यवर्ती कारागृहातील त्याच्या संपर्कात असलेल्या काही गुन्हेगारांना विचारपूस केली. तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडेही चौकशी केली असता नराधम पालटकर हा सायकोच असल्याचे पुढे आले. त्याच्यावर कारागृहात असताना तसे उपचारही होत होते, अशीही माहिती पुढे आली आहे.अफवांचे पेव, पोलिसांची धावाधाव!नराधम पालटकरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे छायाचित्र जारी केले. त्याच्यावर पुरस्कारही जाहीर केला. त्या अनुषंगाने पोलिसांना पालटकर सारखे वर्णन असलेल्या अनेकांबाबत फोन येत आहे. गुरुवारी दुपारी नंदनवन पोलिसांना नराधम पालटकर उमरेडमध्ये असल्याची माहिती एकाने फोन करून दिली. पोलिसांचे पथक तातडीने उमरेडकडे रवाना झाले. मात्र, फोन करणाऱ्याने दिलेल्या वर्णनाची व्यक्ती पालटकर नसल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर