लग्नाचे आमिष दाखवून पाच महिने बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST2021-04-10T04:07:17+5:302021-04-10T04:07:17+5:30

बालाघाटच्या आरोपीचे कृत्य : पारडीत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या युवतीला मध्यप्रदेशात ...

Five months rape by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून पाच महिने बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून पाच महिने बलात्कार

बालाघाटच्या आरोपीचे कृत्य : पारडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या युवतीला मध्यप्रदेशात पळवून नेल्यानंतर एका आरोपीने तेथे तिच्यावर तब्बल पाच महिने बलात्कार केला. नंतर तिला वाऱ्यावर सोडून पळ काढला. विश्वास टाकून ज्याला सर्वस्व सोपविले. त्यानेच दगाबाजी केल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. आरोपीचे नाव सोहन देवचंद जगणे (वय २५) आहे. तो बालाघाट (मध्यप्रदेश) मधील रहिवासी आहे. गेल्या वर्षी तो नागपुरात रोजगाराच्या निमित्ताने आला होता. पारडीत राहात असताना त्याने एका १७ वर्षाच्या मुलीला प्रेम जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिला ७ जुलै २०२० ला नागपुरातून पळवून नेले. बालाघाट येथे नेवून युवतीसोबत तब्बल पाच महिने तो हक्काच्या बायकोसारखा राहिला. या कालावधीत त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध जोडले. २५ डिसेंबर २०२०च्या मध्यरात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने तिला वाऱ्यावर सोडून पळ काढला. राग शमल्यानंतर तो परत येईल, या आशेने पीडित युवतीने चार महिने वाट पाहिली. त्याला परत येण्यासाठी विनवण्या केल्या. मात्र, त्याने दाद दिली नाही. त्याने दगाबाजी केल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित युवतीने गुरुवारी पारडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार अपहरण तसेच बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सोहन जगणे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे.

----

Web Title: Five months rape by showing the lure of marriage