पाच घरफाेड्यांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST2021-02-05T04:40:43+5:302021-02-05T04:40:43+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांनी चाेरट्यासह महिलेला अर्थात त्याच्या आईला नुकतीच अटक केली असून, त्यांनी पाच ठिकाणी घरफाेडी ...

Five burglars exposed | पाच घरफाेड्यांचा पर्दाफाश

पाच घरफाेड्यांचा पर्दाफाश

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : पाेलिसांनी चाेरट्यासह महिलेला अर्थात त्याच्या आईला नुकतीच अटक केली असून, त्यांनी पाच ठिकाणी घरफाेडी केल्याचे कबूल केले आहे. पाेलिसांनी त्यांच्याकडून एकूण २ लाख ३३ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये राहुल यादव, सूरज सोमकुंवर (२३, रा. कपिलनगर, नागपूर) व त्याच्या आईचा समावेश आहे. कामठी शहरातील लुंबिनीनगरात राहणाऱ्या अजिजुल हसन हैदरी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चाेरी झाली हाेती. कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले. ही चाेरी राहुल यादव याने केल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत चाैकशी केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी सूरज व त्याच्या आईला ताब्यात घेतले. त्यांनी अजिजुल हसन हैदरी यांच्यासह अन्य कामठी शहरात एकूण चार ठिकाणी, तर नागपूर शहरातील कपिलनगर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी चाेरी केल्याचे कबूल केल्याने तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साेन्याचे दागिने, माेबाईल, लॅपटाॅप असा एकूण २ लाख ३३ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार सतीश मुंढे यांनी दिली असून, या आराेपींकडून चाेरी व घरफाेडीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ही कारवाई कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याचे दुय्यम पाेलीस निरीक्षक आर.आर. पाल, सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Web Title: Five burglars exposed