शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जेल ब्रेकमधील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 21:20 IST

सत्र न्यायालयाने मंगळवारी नागपूर जेल ब्रेक प्रकरणातील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर, दोन आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : दोन आरोपींची निर्दोष सुटका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी नागपूर जेल ब्रेक प्रकरणातील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर, दोन आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. मोक्काचे गुन्हे मात्र सातही आरोपींविरुद्ध सिद्ध होऊ शकले नाहीत. ही घटना संपूर्ण राज्यात गाजली होती.बिसेनसिंग रामुलाल उईके (वय ३५, रा. मध्य प्रदेश), मो. शोएब ऊर्फ शेख मुस्तफा सलीम खान (वय २४, रा. न्यू मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल रायबहादूर गुप्ता (वय २४, रा. कामठी), प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (वय २१, रा. नेपाल) व आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर (वय २२, रा. पिली नदी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना भादंविच्या कलम २२४ (कायदेशीर अटकेला विरोध) व कलम १२०-ब (कट रचणे) अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या आरोपींना मदत केल्याचा आरोप असणारे गणेश शर्मा व नवाब तौहीद खान हे निर्दोष सुटले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी हा निर्णय दिला.ही घटना ३१ मार्च २०१५ रोजी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास घडली होती. शिक्षा झालेले आरोपी कारागृहातील खिडकीची लोखंडी ग्रील कापून बाहेर पडले व त्यानंतर २३ फूट उंच सीमा भिंत पार करून पळून गेले. सीमा भिंत चढण्यासाठी त्यांनी चादरी व शाली एकमेकांना बांधल्या होत्या. आरोपी फरार झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी माहिती पडले होते. आरोपींतर्फे अ‍ॅड. आर. एच. रावलानी, अ‍ॅड. ए. आर. रावलानी, अ‍ॅड. मंगेश मून, अ‍ॅड. अनुभव मार्डीकर, अ‍ॅड. अवधेश केसरी तर, सरकारतर्फे अ‍ॅड. विजय कोल्हे यांनी कामकाज पाहिले.आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी अटकया घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना तात्काळ निलंबित केले होते. त्यानंतर तपासाची चक्रे वेगात फिरवून आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. धंतोलीचे सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी जेल ब्रेक तर, अजनी झोनचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी बुधवंत यांनी मोक्काचा तपास केला.

टॅग्स :jailतुरुंगSessions Courtसत्र न्यायालयnagpurनागपूर