शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडासह दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच आरोपींना अटक

By योगेश पांडे | Updated: August 21, 2023 18:10 IST

२६ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका तडीपार गुंडाचादेखील समावेश आहे.

सोमवारी मध्यरात्री पावणेदोन ते तीन वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना गुन्हे शाखेच्या पथकाला वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन नगरीजवळील मोकळ्या जागेत संशयित इसम असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता पाच आरोपी दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी तलवार, दोन चाकू, स्टीलचा रॉड, मिरची पावडर, दोरी असे साहित्य आढळले.

पोलिसांनी साईबाबा नगर, खरबी येथील मयुर गजाजन जाधव (२५), रोहीत महादेव गिरी (२२), ऋतिक विजय शेंदरे (२१), गौरव शेखर उरकुडे (२०, श्रावण नगर, वाठोडा) व नूर मोहम्मद फिरोज खान (१९, शिवणकर नगर झोपडपट्टी) यांना अटक केली. त्यांच्याकडून २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीअंती गौरव उरकुडे याला वर्षभरासाठी तडीपार केल्याची बाब समोर आली.

तडीपार असतानादेखील तो नागपूर शहराच्या हद्दीत येऊन गुन्हेगारी कारवाया करत होता. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनटक्के, अविनाश जायभाये, सुनिल ठवकर, दीपक चोले, देवेंद्र नवघरे, अतुल चाटे, चेतन पाटील, स्वप्नील अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकnagpurनागपूर