शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

मच्छिमार संघाची मालमत्ता अध्यक्षांची खासगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 20:26 IST

मच्छिमार संघाची इमारत अध्यक्षाची खासगी संपत्ती नव्हती. अध्यक्षानी परस्पर निर्णय घेऊन सभासदांसोबत विश्वासघात केला असल्याचा आरोप करीत, इमारतीसाठी २६४ सभासद संस्था एकवटल्या असून, संविधान चौकात अध्यक्ष आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.

ठळक मुद्देसंघाच्या इमारतीसाठी एकवटले २६४ संघइमारतीसाठी संविधान चौकात दिले धरणे

आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भ मच्छिमार संघाची इमारत जिल्हा प्रशासनाने हेरिटेज वॉकसाठी जमीनदोस्त केली. ही इमारत मच्छिमार संघाला सोपविण्यापूर्वी संघाच्या अध्यक्षाने सहकार कायद्यानुसार सभासद संस्थांना विश्वासात न घेता, आमसभेत ठराव न घेता, धोरणात्मक निर्णय घेतला. मच्छिमार संघाची इमारत अध्यक्षाची खासगी संपत्ती नव्हती. अध्यक्षानी परस्पर निर्णय घेऊन सभासदांसोबत विश्वासघात केला असल्याचा आरोप करीत, इमारतीसाठी २६४ सभासद संस्था एकवटल्या असून, संविधान चौकात अध्यक्ष आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.माजी खासदार जतीराम बर्वे यांनी मच्छिमार समाजाला उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी १९४४ ला रामटेक येथे मच्छिमार संस्थेची स्थापना केली. त्यानंतर मच्छिमार संघाचे जाळे विदर्भ, राज्य व देशभर पसरले. संघाच्या स्थापनेनंतर कृषी व सहकार विभागाच्या मत्स्योद्योग महामंडळातर्फे झिरो माईल येथे बर्फ कारखाना व कोल्ड स्टोरेजची स्थापना करण्यात आली. १९८५ ला जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व वन विभागाच्या सचिवांना ही जागा कृषी विभागाकडून मत्स्य महामंडळ व महामंडळाकडून विदर्भ संघाला हस्तांतरित झाल्याचे पत्र लिहिले. परंतु हेरिटेज वॉकसाठी संघाची २१००० चौरस फूट जागा लागत असल्यामुळे प्रशासनाने संघाला पत्र दिले. त्यावर अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी जमीन परत करीत असल्याचे होकार पत्र दिले. परंतु २३ जानेवारी २०१७ सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी लोणारे यांना संघाच्या प्राथमिक सदस्यातून निष्कासित केले. त्यामुळे ते अध्यक्ष पदावरूनही निष्कासित झाले असल्याचे संघाच्या सभासदांचे म्हणणे आहे. त्यामुळे पदच्युत अध्यक्षाला जागा लिहून देण्याचे कसलेही अधिकार राहत नाही, असे सभासद म्हणाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संघाला तीन दिवसात जागा खाली करून देण्याची नोटीस दिली. त्या नोटिसीला १० किरायेदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यात न्यायालयाने ८५५४ चौ. फूट जागा संघाची असून, उर्वरित अतिक्रमित जागा ४३०० चौ. फूट संघाने खाली करून द्यावी, असे म्हटले आहे. तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण इमारत जमीनदोस्त केली.प्रशासन आणि अध्यक्षाच्या विरोधात २६४ सभासद संस्थांनी लढा पुकारला आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शनिवारी झालेल्या धरणे आंदोलनात संपूर्ण मच्छिमार येत्या १६ जानेवारीला निषेध नोंदविणार आहे. आजच्या धरणे आंदोलनात अशोक बर्वे, चंद्रलाल मेश्राम, बाबूराव बावणे, कृष्णा नागपूरे, देवीदास चवरे, यादवराव पाटील, यशवंत दिघोरे, राजेंद्र गौर, प्रकाश पचारे, प्रभाकर मांढरे, युवराज नागपुरे, गजेंद्र चावरेकर, योगेश दुधपचारे, रमेश गौर, अ‍ॅड. राजेश नायक, मुकुंद आडेवार, दीनानाथ वाघमारे उपस्थित होते.

टॅग्स :fishermanमच्छीमारnagpurनागपूर