शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ढिवर समाजावर उपासमारीची पाळी; शासनाकडून मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:58 IST

जीव मुठीत धरून परंपरागत व्यवसाय करत असलेल्या कामठी तालुक्यातील ढिवर समाजावर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून तालुक्यातील मच्छीमारीचा व्यवसाय बंद आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जीव मुठीत धरून परंपरागत व्यवसाय करत असलेल्या कामठी तालुक्यातील ढिवर समाजावर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून तालुक्यातील मच्छीमारीचा व्यवसाय बंद आहे.कामठी तालुक्यातून कोलार व कन्हान या नद्या वाहत असून या नदीकाठाने बीना, वारेगाव, सुरदेवी, गादा, आजनी, नेरी, ऊनगाव, असलवाडा, भूगाव, परसाड, पवणगाव, सोनेगाव राजा, चिकना, कढोली, माथनी, झुल्लर, गुमथळा गावात ढिवर समाजाची ६०० कुटुंबे गत तीन पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत. कन्हान व कोलार नदीतून मच्छीमारीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून वास्तव्य करीत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे या मच्छीमारांचा रोजगार हिरावला गेला. घरातील असलेले अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू संपल्यामुळे ढिवर समाजातील नागरिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.तालुक्यातील गादा येथील गोविंदा डायरे (६५) व मनोहर भोयर (६०) यांनी लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यथा मांडली. मच्छी विक्रीतून होणारी रोजची २५० ते ५०० रुपयांची मिळकत थांबली असल्याची ते म्हणाले. इकडे या समाजातील गरजूंना अन्नधान्य व जीवनवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची मागणी अंबादास भोयर, कैलास शेंडे, बाळू भोयर, अजित डायरे, सुत्तम सोनवणे, बबन गोडाळे , श्रीपाद टोहिणे, बबन शिंदे, सुरादेवीचे सरपंच सुनील दुधपचारे, बंडू बावणे, निरंजन केवट यांच्यासह अनेक समाजबांधवांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस