शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

RSS च्या 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच, दसरा कार्यक्रमात मुस्लिम व्यक्ती प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:21 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) नागपुरात विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका मुस्लिम व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं आहे

ठळक मुद्देआरएसएसकडून विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका मुस्लिम व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रितबोहरा समाजाचे मुनव्वर युसूफ यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे२७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) नागपुरात विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका मुस्लिम व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका प्रसिद्ध होमिओपथी डॉक्टरांना मुख्य पाहुणा म्हणून आमंत्रित करत, 92 वर्षात प्रथमच एका मुस्लिम व्यक्तीला हा सन्मान दिला आहे. २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. दस-याला म्हणजेच विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला स्थापनादिवस साजरा करतो. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोहरा समाजाचे मुनव्वर युसूफ यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केलं असून, या माध्यमातून मुस्लिमांमध्ये आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे असं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ आणि त्यांच्या काकांचा सुरुवातीपासूनच आरएसएसशी संबंध राहिला आहे. 1 ऑक्टोबर रोजी आरएसएसने चार वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. प्रत्येक कार्यक्रमात जवळपास 600 मुलं सहभागी होणार आहेत.

देण्यात आलेल्या वृत्तानुसार, याचवर्षी एप्रिल महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोहरा समाजाचे नेते सैय्यदाना यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. सैय्यदाना यांनी याआधी नरेंद्र मोदी सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानाचं कौतुक केलं आहे. 

सरसंघचालक दरवर्षी विजयादशमीला स्वयंसेवकांना संबोधित करत असतात. 2014 रोजी केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर प्रसारमाध्यमांनीही आरएसएसच्या दसरा कार्यक्रमाकडे आधीपेक्षा जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 

गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (आरएसएस) दसरा सण विशेष ठरला. कारण, आरएसएसने 90 वर्षांपासून त्यांचे स्वयंसेवक वापरत असलेल्या खाकी हाफ पॅन्टच्या गणवेशात बदल करत त्यांचे परिवर्तन फुल पॅन्टमध्ये केले. या नव्या गणवेशाचा शुभारंभ विजयादशमी मुहूर्तावर करण्यात आला होता. 

खाण्या-कपड्यांवरुन नाही तर इतरांना आहे तसे स्वीकारणं म्हणजे हिंदुत्व  -  मोहन भागवत हिंदुत्व म्हणजे कोण काय खात आहे किंवा काय परिधान करत आहे हे ठरवणं म्हणजे हिंदुत्व नाही तर,  इतरांना ते जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करणं म्हणजे हिंदुत्व, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. यावेळी मोहन भागवत असेही म्हणाले होते की, त्यांची संघटना इंटरनेवरील आक्रमक व्यवहार आणि ट्रोलिंगचंही समर्थन करत नाही. 'आरएसएस भाजपाला चालवत नाही आणि भाजपाही आरएसएस चालवत नाही. दोघंही एकमेकांसोबत संवाद साधून चर्चा करतात', असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत