प्रथम सत्राची परीक्षा महाविद्यालयस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:48+5:302021-04-17T04:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शुक्रवारी महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली आहे. ...

प्रथम सत्राची परीक्षा महाविद्यालयस्तरावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शुक्रवारी महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली आहे. या पत्रात विद्यापीठाने स्पष्ट केले की, ज्या अभ्यासक्रमाचे प्रथम सेमिस्टर टाईमटेबल वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे, त्यांना सोडून उर्वरित अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा कॉलेजने आपल्या स्तरावर घ्याव्यात. परीक्षेचे आयोजन ५ ते २० मेदरम्यान करण्याचे निर्देशही दिले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी हे पत्र जारी केले आहे. विद्यापीठाने त्याच अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे टाईमटेबल प्रसिद्ध केले आहे, ज्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच ज्या महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या कमी असेल, त्यांनी पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या परीक्षा आपल्या स्तरावर घेण्याचे निर्देश दिले. या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात, प्रश्नपत्रिका विद्यापीठाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार आयोजित कराव्यात. प्रश्न एमसीक्यू स्वरूपात असावेत. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाला पाठवावेत. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे कॉलेजकडून विरोध होण्याची शक्यता आहे. कारण शिक्षकांना कोरोना संक्रमणामुळे महाविद्यालयात बोलाविण्यासाठी कॉलेज व्यवस्थापनाचा विरोध आहे. अशा परिस्थितीत परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी शिक्षकांना दिल्यास शिक्षक नाराज होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यामते शिक्षकांना ही जबाबदारी पूर्ण करायची आहे. शिक्षकांचा विरोध झाल्यास, कारवाई करण्यात येणार आहे.