शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पहिले लग्न लपवून दुसरे केल्यास दुसरीलाही पोटगी द्यावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:33 PM

एखाद्या व्यक्तीने पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केल्यास त्याला दुसऱ्या पत्नीस पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय पहिले लग्न लपवणाऱ्या नवरोबांना दणका

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या व्यक्तीने पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केल्यास त्याला दुसऱ्या पत्नीस पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे महिलांसोबत बनवाबनवी करणाऱ्या नवरोबांना जोरदार दणका बसला आहे.पहिले लग्न व पत्नी अस्तित्वात असताना आपण दुसरे लग्न केले. त्यामुळे कायद्यानुसार दुसरे लग्न अवैध ठरत असल्याने दुसरी पत्नी पोटगी मागू शकत नाही, असा दावा एका नवरोबाने केला होता. परंतु, न्यायालयाने त्याला जबाबदारीपासून पळ काढू दिला नाही. संबंधित नवरोबाला त्याचे पहिले लग्न झाले होते हेच सिद्ध करता आले नाही. तसेच, त्याचे पहिले लग्न झाले होते याची माहिती दुसऱ्या पत्नीला होती याचे पुरावेदेखील त्याला सादर करता आले नाही. उच्च न्यायालयाने या बाबी निर्णयात नोंदवून नवरोबाची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळून लावली. सुरुवातीला जेएमएफसी न्यायालयाने प्रकरणातील दुसºया पत्नीला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अंतर्गत १५०० रुपये पोटगी मंजूर केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे नवरोबाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हा पुरावाही ठरला निष्प्रभआपले पहिले लग्न झाले होते हे दुसऱ्या पत्नीच्या वडिलांना माहीत होते याचा एक पुरावा नवरोबाने सादर केला होता. तो पुरावाही निष्प्रभ ठरला. वडिलांना असलेली माहिती मुलीलाही होती असे ठामपणे म्हणता येत नाही. त्यासाठी वडिलांनी ही माहिती मुलीला दिल्याचे व मुलीने ही माहिती वडिलांकडून मिळाल्याचे कबूल करणे आवश्यक आहे. असे बयान कुठेच आलेले नाही या स्पष्टीकरणासह न्यायालयाने नवरोबाचा पुरावा अमान्य केला.

टॅग्स :Courtन्यायालय