शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

अलिकडच्या मनपा इतिहासात आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही पहिलीच मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 21:00 IST

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अनियमितता करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई सुरू केली. जे.पी. इंटरप्रायजेस या सिमेंट रोड कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्तांनी एक वर्षाकरिता काळ्या यादीत टाकले आहे. कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख ११ हजार ९६५ रुपये दंडही ठोठावला आहे.

ठळक मुद्देसिमेंट रोड कंत्राटदार जे.पी. इंटरप्रायजेसला आठ लाखांचा दंड, काळ्या यादीतही टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्ते मजबूत व टिकाऊ व्हावेत, यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटीकरणाची योजना तयार केली. सिमेंट रस्त्यांची ५० वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला. परंतु काही महिन्यातच सिमेंट रस्त्यांना भेगा पडायला लागल्या आहेत. पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाणे लावलेले नाहीत. नागरिकांनी रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत मनपाकडे अनेकदा तक्रारी केल्या, परंतु याची दखल घेतली जात नव्हती. परंतु तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अनियमितता करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई सुरू केली. जे.पी. इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्तांनी एक वर्षाकरिता काळ्या यादीत टाकले आहे. कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख ११ हजार ९६५ रुपये दंडही ठोठावला आहे. या कारवाईमुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाई व अनियमितता करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध मनपाने पहिल्यांदा अशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्त यांनी क्वॉलिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनियर्स प्रा. लि. आणि मनपाचे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्प (टप्पा-३) रस्ता क्र. ३१ एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रस्त्याचे (अजित बेकरी रोड) पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाणे आवश्यक एम-४५ चे नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आढळून आले. प्रत्यक्षात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे क्युरिंग पिरेड पूर्ण होण्याआधीच लावण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले होते. जे.पी. इंटरप्रायजेसने केलेल्या कामाच्या मोबदल्यात मनपाला ३२ कोटी ४७ लाख ८६ हजार १५१ रुपये अदा करायचे होते. मात्र, कामात त्रुटी आढळल्याने आयुक्तांनी सदर कंपनीला काळ्या यादीत टाकत राशीवर ०.२५ टक्के दंड ठोठावला आहे. लोक निर्माण विभाग महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यातही अनियमततामहापालिकेने आपल्या तिजोरीतून १०१.१८ कोटी खर्च करून पहिल्या टप्प्यात २५.७७५ कि.मी. लांबीच्या ३० रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे कार्यादेश ६ जून २०११ रोजी काढले. हा प्रकल्प २४ महिन्यात पूर्ण करण्याचे कंत्राट युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला देण्यात आले. यात केडीके कॉलेज ते घाट रोड मार्गाच्या सिमेंटीकरणाचाही समावेश होता. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने काही महिन्यातच जगनाडे चौक ते अशोक चौक दरम्यानच्या मार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या.मनपाला आर्थिक संकटात लोटलेराज्य सरकार, महापालिका व नासुप्र यांच्या संयुक्त भागीदारीतून दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांच्या प्रकल्पाची सुरुवात झाली. ८ जानेवारी २०१६ ला शासकीय मंजुरीनंतर ५५.४२ कि.मी.च्या २७९ कोटींच्या कामाचे कार्यादेश काढण्यात आले. विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च हळूहळू ३४० कोटींवर गेला. राज्य सरकार व नासुप्रने प्रत्येकी १०० कोटी दिले. महापालिकेवर १४० कोटींचा आर्थिक भार पडला. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महापालिकेची स्थिती बिकट झाली.तिसऱ्या टप्प्यात अनियमिततेचा बोलबालातिसऱ्या टप्प्यात आधी सहा पॅकेजमध्ये ३०० कोटींचे सिमेंट रस्ते केले जाणार होते. परंतु कंत्राटदार न मिळाल्याने पॅकेजला १० भागात विभागण्यात आले. प्रत्येक टप्पा २० ते २५ कोटींचा होता. परंतु काही कंत्राटदारांचा अनुभव कागदावरच असल्याची माहिती आहे. दोषपूर्ण सिमेंट रोडमुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला. कामे गुणवत्तापूर्ण नसतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. सिमेंट रोडच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त