शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिलाच प्रयोग : नागपुरातील नरसाळा गावाचे होणार ड्रोनद्वारे भूमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:20 IST

नागपूर महानगरपालिकेत नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या नरसाळा या गावाचा सिटी सर्वे (भूमापन) अत्याधुनिक ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनपा क्षेत्रातील एखाद्या गावाचे सर्वेक्षण अशा प्रकारे होणार आहे हे विशेष.

ठळक मुद्देसोमवारपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेत नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या नरसाळा या गावाचा सिटी सर्वे (भूमापन) अत्याधुनिक ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनपा क्षेत्रातील एखाद्या गावाचे सर्वेक्षण अशा प्रकारे होणार आहे हे विशेष.नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात हुडकेश्वर (बु) व नरसाळा या गावांचा समावेश २०१३ साली करण्यात आला. मनपा हद्दीत समाविष्ट झाल्याने सदर गावांचा सिटी सर्वे करण्याची मागणी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीस अनुसरून जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम, भूमी अभिलेख संचालक, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त रवींद्र ठाकरे आणि नागपूर विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे यांच्या संयुक्त पुढाकाराने महाराष्ट्र रिमोट सेन्सींग अप्लीकेशन सेंटर नागपूरचे संचालक सुब्रता दास यांनी अत्याधुनिक ड्रोनद्वारे अतिशय जलद गतीने नगर भूमापनाचे मोजणी काम करण्यासाठी मौजा नरसाळा या गावाची पथदर्शी प्रकल्पांतर्गत निवड करून महाराष्ट्रात पहिल्यांदाच ड्रोन सर्वे करण्यास तयारी दर्शविली आहे.पथदर्शी प्र्रकल्पाअंतर्गत नरसाळ्याचे ड्रोनद्वारे भूमापनाचे काम येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येत आहे. त्याकरिता नरसाळा या गावाच्या हद्दीतील मिळकतधारकांनी आपापल्या मिळकतीच्या हद्दी जागेवर दाखवाव्यात, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नागपूर जी.बी. डाबेराव आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (ग्रामीण) महेश राजगुरू यांनी सांगितले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र