८.७५ लाख लोकांना लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:07 AM2021-07-25T04:07:01+5:302021-07-25T04:07:01+5:30

३.४९ लाख लोकांना दुसरा डोस : १२.२५ लाख डोस दिले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात २३ जुलैपर्यंत ...

The first dose of the vaccine to 8.75 lakh people | ८.७५ लाख लोकांना लसीचा पहिला डोस

८.७५ लाख लोकांना लसीचा पहिला डोस

Next

३.४९ लाख लोकांना दुसरा डोस : १२.२५ लाख डोस दिले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात २३ जुलैपर्यंत ८ लाख ७५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ४ लाख ४९ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला असून एकूण १२.२५ लाख डोस देण्यात आले आहेत.

कोविड संक्रमण रोखण्यासाठी लस हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. ज्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे त्या देशामध्ये कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. याचा विचार करता नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

.....

नागपूरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (२३ जुलै)

पहिला डोज

आरोग्य सेवक- ४६५१२

फ्रंट लाईन वर्कर- ५३४२४

१८ वयोगट- ३१२६६२

४५ वयोगट- १७९०४८

४५ कोमार्बिड - ८९४२३

६० सर्व नागरिक- १९४७४९

पहिला डोज - एकूण ८७५८१८

दूसरा डोज

आरोग्य सेवक- २७१७९

फ्रंट लाईन वर्कर- २८७७५

१८ वयोगट- १७१५३

४५ वयोगट- १२७१६८

४५ कोमार्बिड - २८०५६

६० सर्व नागरिक- १२११५९

दूसरा डोज - एकूण - ३४९४९०

.....

५०० दिवसापूर्वी सापडला होता पहिला रुग्ण

नागपूरमधे ११ मार्च २०२० ला पहिला कोरोनाबधित रूग्ण मिळाला होता. या घटनेला ५०० दिवस पूर्ण झाले आहेत. शुक्रवारपर्यंत शहरात एकूण २२,५४,२१६ कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण ३,३५,२८७ आहे. यामधून ३,२९,८२० रुग्ण बरे झाले आहेत.

...

रिकव्हरी रेट ९८.३७ टक्के

नागपूर शहराचा रिकव्हरी रेट ९८.३७ टक्के एवढा आहे. ६ जून २०२० नंतर पहिल्यांदाच नागपूर शहरात शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. २३ जुलै रोजी ५६४७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. फक्त दोन पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १७५ आहेत. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Web Title: The first dose of the vaccine to 8.75 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.