शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोरोनाबाधित पहिल्या रुग्णाला लवकरच सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 21:05 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्णाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी नमुने घेण्यात आले तर बुधवारी सकाळी पुन्हा नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यास रुग्णाला रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१४ दिवस पूर्ण, प्रकृती उत्तम : नमुने निगेटिव्ह आल्यावर ‘होम क्वारंटाइन’

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्णाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी नमुने घेण्यात आले तर बुधवारी सकाळी पुन्हा नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यास रुग्णाला रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील १४दिवस त्यांना होम क्वारंटाइन म्हणजे घरीच राहणे बंधनकारक असणार आहे. देशाता कोरोना विषाणूच्या आजाराची व्याप्ती वाढत चालली आहे. नागपुरात याचा शिरकाव ११ मार्च रोजी झाला. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले ४५ वर्षीय पुरुष ६ मार्च रोजी नागपुरात आले. प्रकृती खालवल्याने ११ मार्च रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाले. याच दिवशी त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. अहवालात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना मेयोच्या वॉर्ड क्र २४ या आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी, १२ मार्च रोजी त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींची आणि संपर्कात आलेल्यांच्या नमुन्यांची तपासणी केली. यात त्यांच्या ४३ वर्षीय पत्नी व अमेरिका प्रवासात त्यांच्यासोबत असलेला ४५ पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शनिवारी आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. सलग चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. सुरुवातीपासून पहिल्या ४५ वर्षीय पुरुष रुग्णाची प्रकृती उत्तम होती. सात दिवसानंतर या रुग्णाचे नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. परंतु बाधित रुग्णांना १४ दिवस रुग्णालयात ठेवण्याचा नियम असल्याने आज मंगळवारी त्यांचे उपचाराचे दिवस पूर्ण झाले. रुग्णालयातून सुटी देण्यापूर्वी १२ तासांच्या अंतराने नमुने घेण्यात येणार आहेत. ते निगेटिव्ह आल्यावरच रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. यामुळे आता सर्वांनाच त्यांच्या नमुन्याचा अहवालाची प्रतीक्षा आहे.

नमुने निगेटिव्ह आल्यावरच रुग्णालयातून सुटीपहिल्या बाधित ४५ वर्षीय पुरुषाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले आहेत. यामुळे आज त्यांचे सकाळी नमुने घेण्यात आले. १२ तासानंतर पुन्हा नमुने घेतले जातील. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यावरच रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला जाइल. सध्या त्यांना कुठलेही लक्षणे नाहीत.-डॉ. तिलोत्तमा रमेश पराते, प्रमुख, मेडिसीन, मेयो

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)