शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

नागपूरच्या जरीपटक्यात टोळीयुद्धातून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:03 PM

ट्रेनमध्ये सक्रिय अवैध व्हेंडर यांच्यात सुरू असलेल्या टोळीयुद्धातून आरोपी योगेश भोयर याच्यावर गोळी झाडण्यात आली. जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देएक जखमी : अवैध व्हेंडर व्यवसायातून वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रेनमध्ये सक्रिय अवैध व्हेंडर यांच्यात सुरू असलेल्या टोळीयुद्धातून आरोपी योगेश भोयर याच्यावर गोळी झाडण्यात आली. जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीच्या भावासह अन्य दोन आरोपी फरार आहेत. अटकेतील आरोपी पहलवान बाबा दरगाह, मोतीबाग येथील रहिवासी २२ वर्षीय आहे.१९ जून रोजी रात्री गड्डीगोदामच्या पंजाबी लाईन येथे ३५ वर्षीय योगेश भोयर याच्यावर आरोपी शाहरुख व त्याचा लहान भाऊ मोटू व एक सहकारी मुक्का याने हल्ला केला होता. देशीकट्ट्यातून योगेशवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मुक्का तलवार व मोटू कट्टा घेऊन होता. मोटूने दोनवेळा कट्ट्यातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण कट्ट्यातून गोळी न चालल्याने मुक्का याने योगेशवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु योगेश तेथून पळून घरी निघून गेला. घराचा दरवाजा बंद केल्यामुळे आरोपी खाली हात परत गेले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. योगेश याच्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. तो पंजाबी लाईन येथील महिषासूर झोपडपट्टी येथे राहतो. तो रेल्वेत अवैध व्हेंडरची टोळी चालवितो. त्याच्याकडे आठ ते दहा युवकांचा समूह आहे. हे युवक रेल्वेत चणा मसाला व अन्य खाद्यसामुग्रीची विक्री करतात. आरोपी मुक्का, मोटू व शाहरुखसुद्धा कुख्यात गुन्हेगार आहेत. ते सुद्धा पूर्वी रेल्वेत अवैध व्हेंडरची टोळी चालवीत होते. परंतु गेल्या काही दिवसात योगेशच्या टोळीचा रेल्वेमध्ये दबदबा वाढला होता. त्यामुळे आरोपींच्या टोळीचा कारभार कमी झाला होता.त्यामुळे आरोपींनी रेल्वे ट्रॅकवर अवैध दारूचा अड्डा सुरू केला होता. आरोपींचा योगेशशी वाद सुरू होता. एकमेकांना धमकीसुद्धा देत होते. योगेशवर खुनाचे गुन्हे दाखल असल्याने आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती आरोपींना होती. त्यामुळे योगेशला संपविण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यातूनच योगेशवर गोळी झाडण्यात आली. परंतु दोनवेळा ट्रिगर दाबल्यानंतर बंदुकीतून गोळी सुटली नाही. त्यामुळे योगेशचा जीव वाचला. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून शाहरुख शेख याला अटक केली आहे.

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर